https://youtu.be/gRcGO0AYfz0
युरोप खंडात हंगेरी नावाचा एक देश आहे.तिथे रोमा नावाची एक भटकी जमात आहे, ज्यांना जिप्सी म्हणूनही ओळखल्या जाते.तिथे ते नागरी हक्कांपासून वंचित होते. त्यांच्या डेर्डेक तिबोर या नेत्याला इंटरनेटद्वारे बाबासाहेब त्यांचे कार्य कर्तृत्व अन विचार समजले.डॉक्टर आंबेडकरांना प्रेरणास्थान मानून त्यांनी संघटना बांधली तिथे संघर्ष केला.सरकारशी झगडून त्यांनी आपले हक्क मिळवले.मुला-मुलींसाठी डॉक्टर आंबेडकर स्कूल याच नावाने तीन शाळा काढल्या. डेर्डेक तिबोर इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी स्वत: बुद्धिस्ट धम्म स्वीकारला आणि त्यांच्या समुदायालाही त्याची दीक्षा दिली.जगात जिथे कुठे वंचित अन्यायग्रस्त नाडलेला समाज असेल त्यांना बाबासाहेब त्यांचे विचार हे कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.
No comments:
Post a Comment