खोड़वा नियोजन --
कृषिभूषण संजीव माने आष्टा.
ग्रीन मॉर्निंग..
साखर कारखाने सुरु झाले की आपल्या सर्वांची खोड़वा पिकांची तयारी सुरु होते. लागणी बरोबर खोडव्याचे उत्पादन महत्वाचे आणि फायद्याचे आहे.
खोडव्यास नांगरट, कलटिव्हेटर, रोटर, सरी वगैरे मशागतिचि आवश्यकता नसते म्हणजेच तो खर्च नसतो. बियाणे , लागनीचा खर्च वगैरे बाबींचा खर्च नसतो. हे अत्यंत महत्वाचे आहे. याच्या शिवाय अजुन अत्यंत महत्वाचे आणि उत्पादन जास्त मिळण्याची बाब म्हणजे; उस ज्या क्षणी तुटतो त्या क्षणपासून खोडव्याची वाढ सुरु झालेली असते. लागण केले नंतर 15 ते 25 दिवस उसाची उगवण होण्यास लागतात0 आणि नंतर हळू हळू जश्या मुळ्या तयार होतील तशी त्याची सुरुवातीला हळू हळू वाढ होते आणि नंतर जोमाने वाढ होते. खोडव्या मध्ये मात्र वाढ999 लगेच होते कारण त्याच्या p to आगोदरच तयार असतात. त्याला योग्य खत पाणी मिळाले की जोमाने वाढ सुरु होते.
ऊस तुटल्या नंतर पाचट न जाळता सरी मध्ये दाबून घ्यावे किंवा पाचट जास्त असल्यास कुट्टी मशीनने टुकड़े करुन सरित दाबून घ्यावे. पाचट व्यवस्थित कम्पोस्ट होण्यासाठी त्याचेवर 50 किलो यूरिया 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. शक्य झालेस 4 ते 5 किलो कम्पोष्ट जीवाणु पसरावेत.
धारदार कोयता किंवा धार कूदळ किंवा मशीनने बुडखे जमिनि लगत किंवा जमिनित 1 ते 2 इंच खोल वर छाटून घ्यावेत. बुडखे छाटने अत्यंत महत्वाचे आहे. माझ्या अनुभवा नुसार जमिनित 1 ते 2 इंच खोलवर छाटल्याने फुटवे योग्य संख्येत मिळतात. आणि उत्पादवाढते.वाढते toतर वेळी फुटवे जास्त येतात आणि काही काळानी अन्न/ ख़त खाऊन मरुन जातात, त्याचा उत्पादनावर फार वाईट परिणाम होतो.
@ छाटनि नन्तर बुडख्यावर बुरशी नाशक व कीटक नाशक फवारावे.
@ रासा खताची पहिली मात्रा लवकर द्यावीं.
@ रासा खते शक्यतो पहारिणेच वरंब्यात मुळ्याच्या सानिध्यात द्यावेत. हे अत्यंत महत्वाचे आहे.
@ ऊस तुटल्यापासून 30 दिवसांनी व नंतर 20 दिवसाचे अन्तराने फवारानी घ्याव्यात.
@ पाण्याचे नियोजन योग्य असावे.
एकरी खोडाव्यासाठी ख़त नियोजन
अर्धा टक्के चुन्याची निवळि फवारावी.
सेन्द्रीय खते दयावित.
रासा.खते प्रति एकर
1. पहिली मात्रा पहारिने द्यावी.
यूरिया 100 किलो
डीएपी 100 किलो
पोटयाश 75किलो
सूक्ष्म अन्न द्रव्य 15 किलो
गन्धक ग्रान्युअल्स 15 किलो
माग सल्फेट 25 किलो
ह्युमिक आसीड 10 किलो
सेंद्रिय खते किंवा लिम्बोली पेंड 200 ते 500 किलो द्यावे.
2. दूसरी मात्रा 30दिवसानी द्यावी.
यूरिया 100 किलो
लिम्बोली पेंड 20किलो
3. तीसरी मात्रा 60दिवसानी पहारिने द्यावी
मात्रा नंबर एक प्रमाणे सर्व खते पहारिने
यूरिया 100 किलो
डीएपी 100 किलो
पोटयाश 75किलो
सूक्ष्म अन्न द्रव्य 15 किलो
गन्धक ग्रान्युअल्स 15 किलो
माग सल्फेट 25 किलो
ह्युमिक आसीड 10 किलो
सेंद्रिय खते किंवा लिम्बोली पेंड 200 ते 500 किलो द्यावे.
4. 90 दिवस यूरिया 50किलो
5.120 दिवस यूरिया 50 किलो
6. 150 दिवस अमो सल्फेट 50 किलो
पोट्याश 25 किलो
सुक्ष्म अन्न द्रव्ये देणे
सुक्ष्म अन्न द्रव्ये व् मँग सल्फेट ही दोन्ही खते NPK बरोबर न देता थोड्या शेणखतात 5 ते 7 दिवस मुरवत ठेवावेत आणि नंतर द्यावेत. बेसल डोस देण्या आगोदर 5 ते 7 दिवस मिसळुन ठेवावे, आणि लागनिचे वेळी द्यावे.
या मुळे सुक्ष्म अन्न द्रव्यान्ना सेंद्रिय चे कोटिंग होते ,त्या मुळे NPK बरोबर त्याचे प्रेसीपिटेशन होत नाही. दिलेल्या खाताची उपयुक्तता पूर्ण पणे मिळते.
किंवा बाजारात चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये मिळ्तात ती वापरावीत. ती थोडी महाग आहेत.
मोठी बांधनी किंवा भरणी चे वेळी देखिल असेच करावे.
# जीवाणु --
रासा ख़ताची पहिली व तीसरी मात्रा दिल्या नंतर 10 दिवसांनी जीवाणु खते द्यावित.
$ आझोटोंबाक्टर 2 लीटर किंवा 2 किलो
$ पि एस बी 2 लीटर किंवा 4 किलो
$ ट्रायको 2 लीटर किंवा 2 किलो
5 ते 10 दिवस 100 किलो शेणखतात मिसळून सावलित ठेवावे. थोड़ी ओल राहील याची काळजी घ्यावी. नंतर जमिनित ओल असताना सायंकाळी टाकावेत. किंवा लिक्विड जीवाणु ड्रिप मधून सोडावेत.
फवारणी कृषिभुषण संजीव माने आष्टा 9404368518
डॉ बालकृष्ण जमदग्नि यांच्या मार्गदर्शानाखाली लागण किंवा खोड्व्यास गेली 9 वर्ष या पद्धतीने "फ़वारणि" घेत आहे. कमी खर्चाची आणि फार उपयुक्त अशा या फ़वारण्या आहेत. अनुभव घेऊन पहा..
कृषिभुषण संजीव माने आष्टा 9404368518
डॉ बालकृष्ण जमदग्नि यांच्या मार्गदर्शानाखाली लागण किंवा खोड्व्यास गेली 9 वर्ष या पद्धतीने "फ़वारणि" घेत आहे. कमी खर्चाची आणि फार उपयुक्त अशा या फ़वारण्या आहेत. अनुभव घेऊन पहा..
1) पहिली फवारणी
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
खोडव्यासाठी तुट्ल्या पासून 30 दिवसानी आणि नंतर प्रत्येक 20 दिवसाचे अंतराने .
15 लिटरच्या पंपाने फवारणी .
# पोषण द्रव्ये #
*18:18:18 किंवा 19:19:19 - 600 ग्राम प्रती पंप 150 ग्रॅम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये- 160ग्रॅम प्रती पंप 40 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस - 120 मिली प्रती पंप 30 मिली
* बाविस्टिन - 120 ग्राम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* IBA - 1 ग्रॅम
* 6 BA - 4 ग्राम
IBA अल्कोहोल (देशी दारु चालते) 20-30 मिली मध्ये आणि 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 8 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरीत निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 4 पम्प पुरतात*.
2) दूसरी फवारणी
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
लागणी पासून 65 दिवसानी व खोडव्यासाठी 50 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 किंवा 17:44:0 - 900 ग्राम प्रती पंप 150 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्रॅक्ट- 120 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
* *चिलेटेड* कॅलशियम- 500 ग्रॅम -
प्रती पंप 80 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस/ रोगोर- 180 मिली प्रती पंप 30 मिली
* बाविस्टिन/कार्बेंडिझम - 180 ग्राम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 4 ग्राम
* SIX BA - 4 ग्राम
GA अल्कोहोल व 6BA सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि 12 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उर्वरीत वरील निविष्ठा मिसळुन पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 6 पम्प पुरातात*.
3) तीसरी फवारणी
लागणी पासून 85 दिवसानी व खोडव्यासाठी 70 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 किंवा17:44: 0 - 1350 ग्रॅम प्रती पंप 150 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्रॅक्ट 180 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
* पोटॅशियम शोनाइट 1 किलो प्रती पंप 110 ग्रॅम
# पीक संरक्षके #
* मोनोक्रोटोफॉस(आवश्यकतेनुसार)-270 मिली प्रती पंप 30 मिली
* हेक्झकोनेझॉल(आवश्यकतेनुसार)- 270 ग्रॅम प्रती पंप 30 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 6 ग्राम
* SIX BA - 6 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 18 लिटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 9 पम्प पुरातात*.
4) चौथी फवारणी
लागणी पासून 105 दिवसानी व खोडव्यासाठी 90 दिवसानी
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे करता येण्याची शक्यता कमी असते.
# पोषण द्रव्ये #
*13:0:45 - 1000 ग्राम प्रती पंप 100 ग्रॅम
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 500 ग्रॅम प्रती पंप 50 ग्रॅम
* *चिलेटेड* कॅलशियम नायट्रेट -1000 ग्रॅम प्रती पंप 100 ग्रॅम
* ट्रायकाँन्टेनाँल 0.1 % - 500 मिली प्रती पंप 50 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 200 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
* क्विनॉलफॉस - 400 मिली प्रती पंप 40 मिली
* कार्बेंडॅझीम - 400 ग्रॅम प्रती पंप 40 ग्रॅम
# संजिवाके #
* GA - 7 ग्राम
* SIX BA - 7 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 10 पम्प पुरातात*.
5) पाचवी फवारणी (शक्य झालेस)
लागणी पासून 125 दिवसानी व खोडव्यासाठी 105 दी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 - 1350 ग्राम प्रती पंप 100 ग्रॅम
* माग्ने सल्फेट/ मॅग्ने नायट्रेट - 750 ग्राम प्रती पंप 60 ग्रॅम
* सी विड एक्स्ट्राक्ट - 260 ग्रॅम प्रती पंप 20 ग्रॅम
*क्लोरोपायरीफॉस - 400 मिली प्रती पंप 30 मिली
*हेक्झाकोनेझॉल - 400 मिली प्रती पंप 30 मिली
# संजिवाके #
* GA - 10 ग्राम
* SIX BA - 10 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
*एकरी 13 पम्प पुरातात*.
कृषिभूषण संजीव माने आष्टा 9404367518
अजिंक्य माने 9403964040
No comments:
Post a Comment