Wednesday 21 December 2016

एक पुस्तक समाजासाठी

नमस्कार,
# एक पुस्तक गावासाठी

गावांमधे वाचनालये उभी रहावीत असा मानस घेवुन वटवृक्ष इन्फोटेक फाउंडेशन फॉर न्यू जनरेशन ,आष्टा. प्रयत्न करत आहे.
गावागावांमधे वाचन संस्कृती रुजावी आणि
अबालवृध्दांना वाचनाची गोडी लागावी  हा या मागील उद्देश आहे. गावागावात हि चळवळ सुरु व्हावी यासाठी वटवृक्षच्या माध्यामातुन काम सुरु करण्यात आले आहे.या अंतर्गत
गावातील वाचनालयांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असुन वाचनालयांना आवश्यक पुस्तके भेट देण्यात येणार आहेत .
नंतरच्या काळात लोकसहभागातुन या वाचनालयाची निगा आणि व्यवस्था करण्यात येणार आहे .

स्वरुप-
१) नवीन वाचनालये तयार करणे
२) जुन्या वाचनालयांचे पुनरुज्जीवन करणे
३) धडपडणार् या तरुणांना वाचनालयांसाठी बळ देणे असा तिहेरी कार्यक्रम या अंतर्गत हाती घेण्यात आला आहे.

आवाहन-
या मोहिमेमधे सहभागी होण्यासाठी
१) आपण आपल्या जवळील जुनी पुस्तके donate करु शकता.

२) आपण नवी पुस्तके भेट करु शकता .

३) आपल्या सप्रेम भेट मिळालेली पुस्तके देखी शकता .

पुस्तक- कोणत्याही प्रकारचे असले तरी चालेल.
या उपक्रमा अंतर्गत वाळवा तालुक्यातील २ गावांमध्ये
१) आष्टा
२) गोटखिंड
येथे मोफत वाचनालय सुरु झाली असून इतर गावांमध्ये लवकरात लवकर वाचनालय उभी करण्याचा मानस आहे . आपल्या गावातही असे वाचनालय सुरु करावयाचे असेल तर संपर्क करा....

*वटवृक्ष इंफोटेक फाउंडेशन फॉर न्यू जनरेशन आष्टा. "स्वप्नवेल" साई नगर आष्टा 416301 ता: वाळवा जि: सांगली*
7841003073

तर आपण या चळवळीत सहभागी व्हाल अशी आशा बाळगतो..

"एक पुस्तक गावासाठी "

धन्यवाद
आपली स्मिता/ कृषिकन्या

जास्तीत जास्त लोकांपर्यंत या उपक्रमा बद्दल माहीती पोहचवा . समाजा साठी काम करायला वेळ पैसा पाहीजेच अस नाही , लागते ती इच्छाशक्ती आणि संवेदना .....

No comments:

Post a Comment