चार्वाका विवेक दे
गौतम बुद्धा शांती दे
महावीरा अहिंसा दे ,
येशू ख्रिस्ता प्रेम दे
प्रेषित महमदा समता दे
गुरु नानका बंधुता दे
झरतृष्टा वैश्विकता दे.....
शिवराया शक्ती दे
ज्योतिबाराया ज्ञान दे
शाहूराया तळमळ दे
भीमराया संघर्ष दे.....
ईडा पीडा टळो
बळीचे राज्य येवो
तुमच्या जीवनात
सुखसमृद्धी लाभो
सुखसमृद्धी लाभो.....
-
No comments:
Post a Comment