Tuesday 11 October 2016

खऱ्या नवदुर्गा

स्त्रियांमध्ये खऱ्या अर्थाने आत्मसन्मान जागृत करून त्या त्या काळात स्त्रीयांनाच नव्हे तर राज्यकर्त्याला आणि समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या या आधुनिक गणराज्याच्या महागणनायिका खऱ्या अर्थाने नवरात्रात पुजाव्या इतक्या महान या नऊ स्त्रिया ......
खऱ्या अर्थाने नऊ दुर्गा.......
१ ) राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब
२ ) छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धधोरणामध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या सहचारिणी आणि छत्रपती संभाजी महाराजांसारख्या प्रकांड पंडित आणि योध्याला जन्मदेणाऱ्या महाराणी सईबाईसाहेब

३ ) छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः रण -मैदानात उतरून मुघलांशी युद्ध करणाऱ्या आणि औरंगजेबाला शिकस्त देणाऱ्या महाराणी ताराबाई.....
४ ) राजमाता अहिल्याबाई होळकर - मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंंतर २७ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या महाराणी.....

५ ) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले - आमच्या अख्ख्या पिढ्या ज्यांनी दिलेल्या शिक्षणावर उभ्या आहेत त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले .
६ ) मुक्ता साळवे - या देशातील जातीयतेबद्दल इंग्लडच्या राणीला पत्र पाठवून देशातील स्पृश्या-स्पृश्य आणि वर्णव्यवस्थेचे वास्तव मांडणारी मुक्ता साळवे .

७ ) फातिमा शेख - मुस्लिम समाजातील नियमांना फाटा देऊन शिक्षण घेणारी आणि व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करणारी . सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंची खरी शिष्या....
८ ) रमाबाई आंबेडकर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसणारी पत्नी-सहचारिणी.....

९ ) ताराबाई शिंदे - ज्या काळात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोण हा बरोबरीचा समजला जात नव्हता तेव्हा १८८२ ला " स्त्री-पुरुष तुलना " सारखा महान ग्रंथ लिहून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी . अन्यायाविरुद्ध लढणारी एक अभ्यासू .....

या सर्व महानायिकांना अभिवादन करून आपणा सर्वांना  दसऱ्याच्या सदिच्छा .......💐💐💐

No comments:

Post a Comment