*खरीप पिकाच्या कचऱ्यापासून सेंद्रिय कर्ब निर्मिती.*
खरीप हंगामात अनेक द्विदल कडधान्य पिके असतात. त्यांची काढणी आणि रब्बी पेरणीची धांदल एकाच वेळी सुरु असते. रब्बी पेरणीसाठी पूर्व मशागत करून शेत तयार करणे हे मुख्य लक्ष्य असते. मात्र ही खरीप पिके जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप उपयोगी ठरत असतात. यांच्या मुळांवर ज्या गाठी असतात, त्यातून जमिनीत नत्र स्थिरीकरणाचे मोठे काम होते. शिवाय पिकाची काढणी झाल्यानंतर त्या पिकाचा पाला पाचोळा / काडी कचरा वेचून बांधावर टाकला जातो, किंवा जाळून टाकला जातो. त्याएवजी झाडे शेतात तशीच ठेऊन त्यावर रोटाव्हेटर चालवावे आणि त्या झाडांचा चुरा करून घ्यावा. त्यामुळे तो कचरा लवकर मातीत रुपांतरीत होतो. या क्रियेमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मोठी मदत होते. जेवढे सेंद्रिय घटक जमिनीत जिरतील तेवढे त्यांचे रुपांतर सेंद्रिय कर्बात होत असते. म्हणजे पिके जमिनीतून जी खनिज द्रव्ये वाढीसाठी घेतात ती पुन्हा जमिनीला मिळतात. आपण त्यातील केवळ धान्य घेतो म्हणजे झालेली जमिनीची झीज भरून निघते. जमिनीत असलेल्या मित्र किडी सुद्धा या काडी कचऱ्याला मातीत रुपांतरीत करण्यासाठी मदत करतात. उदा. वाळवी, मुंग्या, मुंगळे, शिदोड / गांडूळ, निमाटोड, पैसा हे काम बिनबोभाट करीत असतात. मुग, उडीद, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग अशा सर्व पिकांचे अवशेष जमिनीत जिरवले पाहिजे.
No comments:
Post a Comment