फळबागेसाठी आहेत विविध योजना
-
फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून फळबागासंबंधी विविध योजना आहेत. यामध्ये नवीन फळबागा, शेततळे, पक्षिरोधक जाळी, यंत्रे, नॅपसॅक स्प्रेअर पंप, पॅकहाउस, रायपनिंग चेंबर अशा योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
१) नवीन बागेची स्थापना -
फळपिके - द्राक्षे, केळी, पपई, स्ट्रॉबेरी, आंबा, पेरू
अनुदान - वेगवेगळ्या फळपिकांच्या मापदंडानुसार २४,६६२ ते ८४,६६० रुपयांपर्यंत
२) जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन -
फळपिके - आंबा, काजू, चिकू, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा
अनुदान - प्रति हेक्टरी ४० हजार रुपयांपर्यंत
३) सामूहिक शेततळे -
अनुदान - मांपदडाच्या १०० टक्के, (६५ हजार ते ५.५६ लाख मर्यादेत)
४) पक्षिरोधक जाळी -
अनुदान -५० टक्के
५) प्लॅस्टिक आच्छादन -
अनुदान - हेक्टरी ३२ हजार रुपये
६) गांडूळ खत उत्पादन केंद्र -
अनुदान - ५०,००० हजार रुपये (५० टक्के)
७) यंत्रे -
१) ट्रॅक्टर
मापदंड - ३ लाख रुपये प्रति युनिट
अनुदान - किमतीच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार प्रति युनिट
मागासवर्गीय वर्ग - ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये
२) पॉवर टिलर
मापंदड - एक लाख रुपये प्रति युनिट
अनुदान - किमतीच्या ४० टक्के, जास्तीत जास्त ४० हजार रुपये
मागासवर्गीय वर्ग - किमतीच्या ५० टक्के, जास्तीत जास्त ५० हजार रुपये
८) पीक संरक्षण -
१) मॅन्युअल स्प्रेअर
मापदंड - १२०० रुपये प्रति युनिट
अनुदान - जास्तीत जास्त ५०० रुपये प्रति युनिट
मागसवर्गीय वर्ग - ६०० रुपये
२) पाॅवर नॅपसॅक
मापदंड - ६२०० प्रति युनिट
अनुदान - जास्तीत जास्त २५०० प्रति युनिट
मागासवर्गीय वर्ग - ३१०० रुपये प्रति युनिट
९) पॅक हाउस -
प्रकल्प खर्च - ४ लाख रुपये प्रति युनिट
अनुदान - प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के
१०) रायपनिंग चेंबर -
मापदंड - एक लाख रुपये प्रति मेट्रिक टन (३०० मेट्रिक टन क्षमतेसाठी)
अनुदान - किमतीच्या ३५ टक्के, सर्वसाधारण क्षेत्रासाठी ५० टक्के,
११) कमी किमतीचे फळ भाजीपाला साठवण केंद्र -
मापदंड - दोन लाख नवीन युनिटसाठी व एक लाख युनिट आधुनिकीकरणासाठी
अनुदान - ग्राह्य खर्चाच्या ५० टक्के
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे -
- सात बारा उतारा
- आठ अ उतारा
- सर्व्हे, गट दर्शवणारा उतारा
- बँक पासबुकची झेरॉक्स
- प्रकल्पाची छायाचित्रे
टीप - कागदपत्रासंबधी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क - जवळच्या तालुका कृषि आधिकारी कार्यालय
No comments:
Post a Comment