*उसावरील लोकरी माव्याचे जैविक आणि रासायनिक नियंत्रण.*
उसावर लोकरी मावा येण्याचे प्रमाण वाढले आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९० टक्के दीर्घ काळ टिकली तर या किडीचा प्रसार आणि वाढ झपाट्याने होते. ऊस लागवड पट्टा पद्धतीने केल्यास नियंत्रण मिळविणे सोपे जाते. जैविक किड नियंत्रणात क्रायसोपार्ला कारणी या परभक्षक मित्र किडीचे अंडीपुंज असलेले कार्ड पानाच्या मागील बाजूने स्टेपल करावे. किंवा डीफाऍफिडीव्हेरा आणि मायक्रोमास इरोगत्स या मित्राकीडीचे कोश अवस्थेतील कीटक सोडावे. ही संख्या एकरी ४/५ हजार असावी. यासाठी पिकाचा केंद्रबिंदू निश्चित करून त्याच्या आठही दिशांना सुमारे ५० फुट अंतरावर या किडी सोडाव्या. याशिवाय कोनाबाथ्रा आणि सिरफीड माशी यासुद्धा मित्रकिडीच्या साह्याने लोकरी मावा नियंत्रण करता येते. मात्र या किडी सोडण्यापूर्वी १५ दिवस आणि पुढे कोणतीही रासायनिक फवारणी करू नये. या किडी उपलब्ध न झाल्यास एक लिटर पाण्यात मेलथिओन २ मिली आणि डायमेथोएट १ मिली स्टीकर सह फवारणी करावी. याशिवाय क्विनोलफाॅॅस, असिफेट सुद्धा चालते. फवारणी एक आठवड्याच्या अंतराने किमान तीन वेळा करावी. सहा महिने वयाच्या उसाला एकरी सहा किलो आणि सहा ते नऊ महिने वयाच्या उसाला आठ किलो दाणेदार फोरेट जमिनीतून पिकाच्या मुळाशी देऊन हलके पाणी सोडावे. ही किड प्राथमिक अवस्थेत लक्षात आल्यास बाधित पाने अलगद कापून काढून जाळून नष्ट करावी. पिकात गवत माजू देऊ नये. युरियाचा वापर कमी करावा, त्याएवजी डीएपी, कॅॅल्शियम नायट्रेट द्यावे.
*शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित* सभासद व्हा! व विविध पिकांची, शेती आधारित उद्योग, प्रक्रिया उद्योगाच्या माहितीसाठी रोज भेट द्या.
आमचा ब्लॉग : watavrukshablogspot.com
संपर्क :7841003073
No comments:
Post a Comment