Wednesday, 24 August 2016

सोयाबीन साठी द्रवरूप खताची फवारणी

*सोयाबीन वजन वाढण्यासाठी द्रवरूप खताची फवारणी.*

सोयाबीन पिकाची फुल कळी अवस्था जाऊन शेंगा लागणे सुरु झाले असताना द्रवरूप खताची फवारणी केल्यास सोयाबीन दाण्यांचे वजन लक्षणीय वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. शेंगेत दाणे भरत असताना पिकाला पोटॅश ची जास्त गरज निर्माण होते. शिवाय फोटोसिंथेसिस ( प्रकाश संश्लेषणाची ) गरज असते. ज्यामुळे शेंगेतील दाण्याचे वजन वाढते, आपोआपच उत्पादन वाढलेले दिसते. त्यासाठी शेंगा लागणे सुरु झाले की ००/५२/३४ या किंवा पोटॅशियम नायट्रेट या द्रवरूप खताची फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी केल्यास त्याचा फायदा जास्त होतो. याशिवाय ज्या भागात पावसाने ओढ दिल्यामुळे पीक ताणावर आले असेल तर हि फवारणी अधिक उपयोगी ठरते. तसेच पाणी असल्यास एक वेळ तरी देण्याची व्यवस्था करावी. स्प्रिंकलर असेल तर त्याने पाणी दिले तरी चालते. पाणी देणे शक्य नसल्यास कोळपे / डौरे याला पासे जवळ आडवी दोरी किंवा गोणपाट बांधून पिकाला बुडाशी मातीची भर द्यावी. यासर्वांचा परिणाम शेंगा अधिक लागणे, लागलेल्या शेंगेत दाणे भरणे, तसेच सर्व दाण्यांचे उत्तम पोषण होऊन सर्वांचे वजन सारखे भरते.

No comments:

Post a Comment