Friday 17 June 2016

किडनी ख़राब होण्याची कारणे...

*किडनी डॅमेज करू शकतात तुमच्या या सवयी*👏🏻👏🏻👏🏻
🔻किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात मिनरल्स आणि आवश्यक अॅसिड्स संतुलित ठेवते.

आज आम्ही तुम्हाला किडनी खराब होण्यामागच्या काही सवयींविषयी सांगत आहोत.

*🏾लघवी रोखणे☑*
जर तुम्ही जास्त प्रमाणात लघवी रोखून धरत असाल तर ही सवय तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक आहे.
यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते आणि किडनी खराब होते.
यामुळे लघवी कधीही दाबून ठेवू नये.

*🏾पाणी कमी पिणे☑*
जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पीत असाल तर किडनीला रक्त शुद्ध करण्यासाठी लिक्विड लागते ते पर्याप्त प्रमाणात मिळणार नाही आणि तुमच्या रक्तामध्ये जमा झालेली घाण तुमच्या शरीरातच राहील.
यामुळे निश्चितच तुमची किडनी लवकर खराब होऊ शकते.

*🏾मीठ जास्त खाणे☑*
शरीराला योग्यप्रकारे काम करण्यासाठी मीठ म्हणजेच सोडियमची आवश्यकता असते.
जर तुम्ही फळ, भाज्या नियमितपणे खात असाल तर त्यामधून तुम्हाला पर्याप्त प्रमाणात हे तत्व मिळते.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमचे ब्लडप्रेशर वाढेल आणि किडनीवर अतिरिक्त दबाव टाकेल.
दिवसातून 5 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम घेऊ नये.

*🏾कोल्ड्रिंक्स☑*
जर तुम्ही कोल्ड्रिंक्स पीत असाल तर हे तुमच्या संपूर्ण शरीरासाठी किती घातक ठरते याचा तुम्हाला अंदाज नसेल.
जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्यास तुमच्या शरीरातील प्रोटीन लघवीद्वारे बाहेर पडते. याचा अर्थ तुमची किडनी त्यावेळी योग्यप्रकारे काम करत नाहीये किंवा डॅमेज झाली आहे.
*🏾पूर्ण झोप न घेणे☑*
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा किडनीच्या नवीन पेशींचे नवनिर्माणहोते.
यामुळे तुम्हाला पूर्ण आणि शांत झोपेची आवश्यकता असते.
जर तुम्ही योग्य प्रकारे झोपले नाही तर या क्रियेमध्ये बाधा निर्माण होईल आणि तुमच्या किडनीवर याचा वाईट प्रभाव पडेल.

*🏾मांसाहार☑*
मांसाहार केल्यामुळे किडनीच्या मेटाबॉलिज्मवर जास्त दबाव पडतो.
जर तुम्ही आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल तर याचा अर्थ तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागेल.
जे भविष्यात तुम्हाला विविध अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.

*🏾दारू आणि सिगरेट☑*
जास्त प्रमाणात आणि नियमितपणे सिगरेट, दारू सेवन करणे तुमच्या लिव्हर आणि किडनीवर अत्यंत वाईट प्रभाव टाकतात.
या सवयी तुम्हाला मृत्युच्या खूप जवळ घेऊन जातात.

*🏾आहारात पोषक तत्वांची कमतरता☑*
आहारामध्ये ताजे फळ, भाज्या असणे किडनी आणि संपूर्ण शरीरासाठी खूप आवश्यक आहे.
किडनी फेल आणि स्टोन होण्यामागे मुख्य कारण आपल्या आहारातील मिनिरल्स आणि व्हिटॅमिनची कमतरता हे आहे.
मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन किडनी निरोगी ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
डॉ. निरज गांधी
M. Ch Urology
मुत्रविकार तज्ञ,
युरोकेअर हॉस्पिटल, अहमदनगर
मोबाइल — 8108700757

No comments:

Post a Comment