Tuesday 31 May 2016

अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष

👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
🌼 *राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती विशेष* 🌼
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
   
     *राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* ह्या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या *'तत्त्वज्ञानी राणी'* म्हणून ओळखल्या जातात. उत्तम प्रशासक म्हणून त्यांची जगामध्ये ख्याती आहे..
     
🌸 *पूर्ण नाव - पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव होळकर.*

🌸 *जन्म - मे ३१ , इ.स. १७२५, चौंडीगाव , जामखेडतालुका , अहमदनगर , महाराष्ट्र.*

🌸 *मृत्यू- ऑगस्ट १३, इ.स. १७९५ महेश्वर*

🌸 *अधिकारकाळ - डिसेंबर ११, इ.स. १७६७ - ऑगस्ट १३, इ.स. १७९५*

🌸 *राज्याभिषेक - डिसेंबर ११, इ.स. १७६७*

🌸 *राज्यव्याप्ती - माळवा*

🌸 *राजधानी - माहेश्वर, इंदोर. (Maheshwar south of Indore on the Narmada River)*

🌸 पूर्वाधिकारी - खंडेराव होळकर

🌸 दत्तकपुत्र - तुकोजीराव होळकर

🌸 उत्तराधिकारी - तुकोजीराव होळकर

🌸 वडील - माणकोजी शिंदे

🌸 राजघराणे - होळकर
-------------------------------------

*महाराणी अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.*

              🌻 *बालपण* 🌻

🔷 अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी *महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी*या खेड्यात झाला.

🔷 वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.

🔷 त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.

🔷 बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर व माळवा प्रांताचे जहागीरदार होते.

🔷 ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले.

🔷 अहिल्यादेवी प्रभावी व तेजस्वी असल्या मुळे त्यांनी स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

🔷 त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बगत होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत.

🔷 *मुलाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी अहिल्यादेवीस सती जाऊ दिले नाही. आणि सर्वप्रथम सुभेदार मल्हाररावांनी सती या प्रथेस विरोध केला हा इतिहास आहे. जो आजही  कोणी सांगत नाही हे दुर्दैव..*

🔷 त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.

🔶 *एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे.*

🔶 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हया भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात.

🔶 त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.

🔶 अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले.

🔶 १२ वर्षांनंतर, त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्यादेवींनीआपल्या राज्याला तुंगांपासून वाचवले.

🔶 त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

🔷 अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

🔶 महाराणी अहिल्यादेवी यांनी स्वखर्चाने म्हणजे स्वतःच्या तिजोरीत पैशाने महादेवाची तिर्थ स्थळे म्हणजे 12 जोतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला व सुशोभीकरण केले. तसेच त्या ठिकाणे पिण्याच्या पाण्याचे कुंड बांधले.

🔷 भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला, .आणि महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले.

🔷 त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले.  त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

🔶वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.
---------------------/----------------------

      🌻🚩⚖ *शासक* ⚖🚩🌻
🍀 मल्हाररावांनी प्रशासकीय व सैन्याच्या कामात त्यांना पारंगत केलेले होते.

🍀 त्या आधाराने अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.

🍀 पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली.

🍀 त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्यादेवीच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते.

🍀 महाराणी अहिल्यादेवींनी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत..

🍀 पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने त्यांना विरोध केला होता त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले.

🍀 महाराणी अहिल्यादेवी यांनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत.

🍀 जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते.

🍀 त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

🍀 अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही.

☢ त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

☢ अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी प्केल्या.

☢ त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली.

☢ महाराणी अहिल्यादेवी यांच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे.

☢ एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला.

☢ *महाराणी अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला.*

☢ *तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.*

☢ *महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती.*

🏵 *महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना महाराणी अहिल्यादेवींनी आश्रय दिला.*

🏵 कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे.  त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

🏵 *एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो.*

🏵 इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

         📚📖 *प्रकाशित पुस्तके* 📖📚

📕'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
📕'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
📕'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
📕अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
📕अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
📕अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
📕'कर्मयोगिनी' : लेखिका - विजया जहागीरदार
📕महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
📕'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर
========================
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌏 *विश्वरत्न राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांच्या *291व्या जयंती* निमित्त हार्दिक शुभेच्छा व त्रिवार *अभिवादन*  🙏�🙏�🙏�🙏�🙏�
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment