🌹🌹🌹प्रेम का करू नये
🌹🌹
डोंगर दर्यामधून वहनार्या नाजूक झर्यासारखे 
तुझ्या नाजूक सौंदर्यावर प्रेम का करू नये 
वार्याची झुळुक आल्यावर अलगद तुझ्या डोळ्यावर
 येणार्या केसांच्या बटांवर प्रेम का करू नये 
पैंजणाच्या घुंगूरच्या आवाजाने तू येण्याची चाहूल लागणार्या
 त्या पैंजनावार प्रेम का करू नये 
पाउस पडून गेल्यावर निसर्ग जसा हसतांना दिसतो 
अशा तुझ्या मोहक हसण्यावर प्रेम का करू नये
समुद्राची लाट जणू किनार्याला लाजून जशी माघारी जाते
 अशा तुझ्या लाजन्यावर प्रेम का करू नये 
तरीही तू विचारतेस माझ्यावर प्रेम का करतोस 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 -
 
 
 
 
No comments:
Post a Comment