Friday, 22 April 2016

जागतिक वसुंधरा दिन

आज २२ एप्रील हा दिवस जागतिक वसुधंरा दिन ===:
सूर्य हा साैर मालिकेतील केन्द्रस्थानी असलेला अतिशय तप्त असा वायुचा प्रचंड माेठा गाेळा आहे. आपला पृथ्वीचा भाग्यविधाता सूर्य हा पृथ्वीपासून  १४ काेटी ९६ लाख, किलाेमिटर आहे.सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रमुख आधार आहे.
पृथ्वीभाेवतीच्या गाेलाकार वायुरुप पट्यास वातावरन म्हटले जाते.हे वातावरण,अनेक वायुंचे मिश्रण आहे.यात नायट्राेजन ७८.०३ तर अॉक्सिजनचे प्रमाण २१% आहे.तसेच अॉरगान हा वायू ०.९४% तर कार्बन=डाय अॉक्साईडचे प्रमाण फक्त ०.०३ % आहे आणि हैड्राेजन वायूचे प्रमाण ०.०१% असे अत्यल्प आहे.
परंतु माझ्या तमाम बंधू आणि बघिंणिंनाे साप्रंत काळात आमची जीवनदाहिनी वसुधंरा आपल्या अस्तीत्वासाठी धडपडत आहे.वारेमाप व भाैतीक विकासाच्या नावाने,प्रगतीच्या ईरशेने पृथ्वीला आेरबडले जात आहे.पृथ्वी वरील झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे,प्रदूषणाची पातळी धाेक्याच्या पातळीवर गेली आहे.विदर्भातील चन्द्रपूर शहर तर भारतात प्रदूषीत शहरामध्ये चाैथ्या क्रमांकावर विराजमान झालेले  प्रदूषित शहर म्हणून आेळखले जाते.
पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७०% तर जमिनीचे प्रमाण ३०% आहे. त्यातही जंगलाचे प्रमाण १७%आले आहे.
महाराष्ट्र राज्यात गडचिराेली, चंन्दपूर,नंदूरबार जिल्हे वगळले तर महाराष्ट्रात सुध्दा जंगलाचे प्रमाण दिवसेदिवस घटत आहे.
तेव्हा या पृथ्वीला आपणास आता वाचवायचे असेल तर, प्रत्येकाने एक झाड लावून, ते झाड जगवून ,संगाेपन करुन,आपल्या पृथ्वीमातेला वाचविण्याचा संकल्प करु या.
पृथ्वीच जर जगली नाही,अंतराळात टिकली नाही  तर ,संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व धाेक्यात आहे
शासनाला सुध्दा विकासाच्या नावाने पृथ्वीला डंक मारु देवू नये.
म्हणून लक्षात ठेवा,पृथ्वी आहे,म्हणून आपण आहे.चला तर आजपासून वसुंधरेचे सरक्षण करु या. मानवजातीला वाचवूया
जिंदगी के हितमे अविनाश टाके आैर परिवार,स्नेहजनी की आैरसे यह हातसे लिखी हुई Post सादर।

No comments:

Post a Comment